वाहतूक कोंडीने हैराण नागरिक; रस्ता रुंदीकरणाची तातडीची गरज,शेतकऱ्यांचीही तयारी; रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देण्याची तयारी!


साडेसातनळी–केशवनगर–मांजरी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी क्रांती शेतकरी संघाची जोरदार मागणी

पुणे (प्रतिनिधी):

साडेसातनळी ते केशवनगर–मांजरी या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी क्रांती शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघाचे अध्यक्ष श्री. अमोल नाना यशवंत तुपे यांनी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका व संबंधित विभागांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या हा रस्ता केवळ 10 ते 15 फूट रुंदीचा असून परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्याच्या एका बाजूस वन विभागाची मोकळी जागा असून ती रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच शासनाचा खर्चही वाचेल आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान टाळता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.अमोल नाना

तुपे यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, वन विभागाकडून जमीन उपलब्ध होण्यात अडचणी आल्यास जनहितासाठी स्वतःची जमीन देण्यासही ते तयार आहेत. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे काढण्यासही त्यांनी संमती दर्शवली आहे.

या वेळी निशिकांत दादा अहिरे, विक्रम लोणकर, रामभाऊ खोमणे, विजय दरेकर, दिलीप व्यवहारे, राहुल बायस, विशाल काकडे, संदीप तात्या तुपे, निलेश जाधव, वेदांत तुपे, मोनू गायकवाड यांच्यासह परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साडेसातनळी, केशवनगर आणि मांजरी परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!