१९/एप्रिल/ २०२६,संविधान प्रतिष्ठान व यमराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर श्रीराम चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


पुणे: हडपसर परिसरात संविधान प्रतिष्ठान व यमराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजू (भाऊ) पटणल्लु (संस्थापक अध्यक्ष, संविधान प्रतिष्ठान) तसेच श्री. केतन (भाऊ) सकाटे (संस्थापक अध्यक्ष, यमराज प्रतिष्ठान) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी युवा एकजुट डिजिटल मीडिया न्यूज यांचेही सहकार्य लाभत आहे.

कार्यक्रमांतर्गत रविवारी, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत भव्य विद्युत रोषणाई व डीजे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे येथे पार पडणार असून परिसरातील विविध सामाजिक संघटना व बुद्ध विहार समित्यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे.

आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहून जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार, काळेपडळ,मलिंद बुद्ध विहार, रामटेकडी,पिंपळ बुद्ध विहार, रामटेकडी,औद्योगिक वसाहत हडपसर,तक्षशिला बुद्ध विहार, रामटेकडी,पंचशील बुद्ध विहार, मांजरी,जेतवन बुद्ध विहार, काळेपडळ,प्रज्ञा बुद्ध विहार, गंगानगर,पंचशील बुद्ध विहार, रामटेकडी,वंदे मातरम मित्र मंडळ, हडपसर गाव,आरंभ प्रतिष्ठान, तरवडे वस्ती,जय भवानी मित्र मंडळ, काळेपडळ,मार्कंडेय मित्र मंडळ, गोसावी वस्ती,गुरुदेव मित्र मंडळ, शिंदे वस्ती,त्रिमूर्ती मित्र मंडळ, गोसावी वस्ती,छत्रपती संभाजी मित्र मंडळ, काळेपडळ,


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!