हडपसरमध्ये कोट्यवधींची आर्थिक फसवणूक; प्रशांत अनिल तावळे याच्याविरोधात गुन्हा दाखल
हडपसर (पुणे):
शेतकरी व गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालक व संचालक प्रशांत अनिल गवळी याच्यासह संबंधितांविरोधात
हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी FIR क्रमांक 0049/2026 नुसार 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.52 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. ही फसवणूक 21 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत झाल्याचे प्रथम खबरी अहवालात नमूद आहे.
आरोपी प्रशांत अनिल तावळे याने शेतीविषयक व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा निश्चित परतावा तसेच अल्प कालावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारली. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना रक्कम परत देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 318(4), 336(2), 336(3), 340(2), 316(5), 3(5), 61(2) तसेच महाराष्ट्र ठेवी दारांच्या हित संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगन्नाथ जगदाळे करत असून, आरोपी प्रशांत अनिल गवळी याच्या बँक खात्यांची तपासणी, मालमत्तेचा शोध व इतर फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात आणखी अनेक नागरिक व शेतकरी फसवणुकीला बळी पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.









