हडपसर गाडीतळ येथे महाकाय होर्डिंग कोसळले; मोठा अनर्थ टळला! !!


गाडीतच चौकातील हेडिंग ची अवस्था 

पुणे – हडपसर गाडीतळ परिसरातील पी.एम.टी. बिल्डिंगवर लावण्यात आलेले एक महाकाय होर्डिंग काल झालेल्या जोरदार पावसात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने हे होर्डिंग बिल्डिंगच्या भिंतीला अडकल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

स्थानिक नागरिकांच्या मते, या होर्डिंगची मजबुती आणि सुरक्षितता याबाबत आधीपासूनच प्रश्नचिन्ह होते. पावसामुळे ते कोसळल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा धोकादायक होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुणे महानगरपालिका तसेच आकाश चिन्ह (होर्डिंग) विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदारांवर त्वरित कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!