दुर्वांकुर मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा मा .निलेश शेठ लोंढे – यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हडपसर:
दुर्वांकुर मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा निलेश शेठ लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कष्ट आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही, तर अनेक युवकांना मोबाईल शॉपी सुरू करून देत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
निलेश लोंढे हे निस्वार्थीपणे युवकांसाठी सतत कार्यरत असून, बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवक आज स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.
पुणे शहरभर दुर्वांकुर मोबाईल शॉपी ही युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, निलेश शेठ लोंढे यांचे कार्य समाजासाठी आदर्श मानले जात आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी व लाभार्थी युवकांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!!!









