हडपसर क्रूरतेचा कळस! कबुतरांच्या ढाबळीजवळ बांधून तरुणाला बॅटने झोडपले; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली!!!!


हडपसरमध्ये धक्कादायक घटना: कबुतरांच्या चोरीच्या संशयावरून तरुणाची बेदम मारहाण करत हत्या !!!!!

हडपसर (पुणे):

कबुतरे चोरण्याच्या संशयावरून एका तरुणाला लाकडी बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील शंकर मठ येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास शंकर मठ, हडपसर येथील पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत एक तरुण संशयास्पद रितीने उभा असल्याचे काही जणांना दिसले. तिथे असलेल्या कबुतरांच्या ढाबळीजवळ तो तरुण उभा असल्याने, तो कबुतरे चोरण्यासाठीच आला असावा असा संशय आरोपींना आला.

या संशयावरून पाच जणांनी मिळून त्या तरुणाला पकडले आणि लाकडी बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर आरोपींनी त्या तरुणाला कबुतरांच्या ढाबळीजवळच बांधून ठेवले.

सकाळच्या सुमारास बांधून ठेवलेल्या तरुणाची प्रकृती खालावू लागल्याचे लक्षात येताच, त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या गुन्ह्यात पोलिसांनी गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी (वय २३), मोनु विजयकुमार माजी (वय २६) आणि बंटी विजयकुमार माजी (वय १८) (सर्व रा. शंकर मठ, वैदूवाडी, हडपसर) या चार आरोपींना निष्पन्न करून कारवाई केली आहे. या प्रकरणातील पाचव्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास सुरू आहे.

एका किरकोळ संशयावरून तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!