हडपसर गाडीतळात बॅरिकेडचा गोंधळ; दोन पीएमटी बसची धडक, जबाबदार कोण? जनतेचा सवाल!!!!


हडपसर गाडीतळ येथे बॅरिकेडमुळे दोन पीएमटी बसची एकमेकास

धडक; जबाबदार कोण?

हडपसर : हडपसर गाडीतळ परिसरात लावण्यात आलेल्या बॅरिकेडमुळे दोन पीएमटी बसची  धडक झाल्याची घटना घडली असून, या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले असून, सासवडवरून पुण्याकडे येणाऱ्या तसेच पुण्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी येथे असते. त्यातच रस्त्याच्या मधोमध उभारलेला एक बुथ आणि बॅरिकेडमुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. याच गोंधळातून दोन पीएमटी बस एकमेकांना धडकल्या.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत, “रस्ता आधीच अरुंद असताना अशा पद्धतीने बॅरिकेड व बुथ लावल्यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जात आहे,” असा आरोप केला आहे. तसेच या प्रकाराला जबाबदार कोण—पालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक की वाहतूक विभाग अधिकारी—याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी तातडीने बॅरिकेड हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!