मांजरी: घुले वस्ती येथील जुन्या कॅनॉलला प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे बेबी कॅनल फुटला पाण्यामुळे कष्टकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त; अमोल तुपे यांचा मदतीचा हात!!!!!
मांजरी: घुले वस्ती परिसरात जुन्या कॅनॉल फुटल्या मुळे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कष्टकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्यामुळे घरातील अन्नधान्य, घरगुती साहित्य तसेच रोजीरोटीचे साधन पाण्याखाली गेल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. नेते आले अधिकारी आले आश्वासन दिले आणि निघून गेले, पण


या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व लोकसेवक अमोल नाना तुपे यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला. गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभावित कुटुंबांना किराणा, रेशन व धान्याचे वाटप करून त्यांना दिलासा दिला.
अचानक आलेल्या या संकटामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी अमोल तुपे यांच्या मदतीमुळे कुटुंबांना सण साजरा करता आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून, “अशा कठीण काळात मदतीला धावून येणारे खरे जनसेवक आहेत,” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे जुन्या कॅनॉलची दुरुस्ती व योग्य देखभाल करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.









