पुणे : हडपसर येथील समिता गॅस परिसरात भरलेले गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीवर अतिक्रमण विभाग व पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांना वेळेवर गॅस मिळावा म्हणून स्थानिकांनी गाडी अडवत पोलिसांकडे विनंती केली.
माहितीनुसार, रस्त्यावर उभी असलेल्या भरलेल्या गॅस सिलेंडरच्या गाडीवर अतिक्रमण विभागाने कारवाई करत गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी गाडी अडवून, “गाडीवर दंडात्मक कारवाई करा, मात्र गॅसची गाडी घेऊन जाऊ नका. नागरिकांना गॅस मिळणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी मागणी पोलिसांसमोर मांडली.
दरम्यान, पोलीस मात्र कारवाईवर ठाम होते. परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण होत असताना सामाजिक कार्यकर्ते तथा क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे आणि माजी सभापती संदीप नाना तुपे यांनी घटनास्थळी मध्यस्थी करत नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय साधला.
यानंतर अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक बनकर यांना फोनवरून परिस्थितीची माहिती देण्यात आली. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी गॅस सिलेंडरच्या गाडीवरील कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले.
तुपे बंधूंच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हा वाद शांतते
त मिटला असून स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला.









