ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलअनधिकृत शाळेवर कारवाईचा प्रश्न : 2.55 कोटी दंड वसुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ???


पिंपरी चिंचवड येथील लिंक रोडवरील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल या अनधिकृत शाळेबाबत मोठा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

 

Fir हि जय डिकोस्टा आणि समीर गोरडे orchid the international school var शिक्षण अधिकारी संजय नाईकने यांनी केले होते आणि हा दंड त्यांना आकाराला होता तरी आजुन अधिकारी कारवाई करत नाही या मागचं कारण भ्रष्टाचार आहे का ?

 

सन 2018 पासून 2024 पर्यंत अनधिकृतपणे शाळा चालविल्याच्या प्रकरणात शासन नियमानुसार सुमारे 2 कोटी 55 लाख 50 हजार रुपये (2,55,50,000) इतका दंड आकारला जाणे अपेक्षित असताना तो अद्याप पूर्णपणे वसूल करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी संदीप गायकवाड यांनी राज्याचे शिक्षणमंत्री यांना तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शाळेविरोधात अनेक तक्रारी झाल्यानंतरही केवळ 6 ते 7 लाख रुपयांपर्यंतच दंड वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदारांच्या मते, शाळा सन 2018 ते 2024 या कालावधीत अनधिकृतपणे सुरू होती. शासनाच्या नियमानुसार प्रति दिवस 10 हजार रुपये या दराने दंड आकारला असता एकूण दंडाची रक्कम 2.55 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. मात्र प्रत्यक्षात इतक्या मोठ्या रकमेची वसुली न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

तरीही संबंधित संस्थेवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाचा महसूल वसूल करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांस कडून करण्यात आला आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!