भेकराई बस डेपो शेजारी अवैध धंदे जोमात; नागरिकांमध्ये संताप, कडक कारवाईची मागणी!!!!


हडपसर (प्रतिनिधी): भेकराई नगर परिसरातील बस डेपो शेजारी दिवसाढवळ्या हातभट्टी दारू विक्री व मटका धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या Bhekarai Nagar Police Chowki जवळच हे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा धंद्याला पोलीस प्रशासनाचा  हातभार तर नाही ना ?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथे खुलेआम गावठी दारू विक्री होत असून सर्वत्र दारू चे फुगे पडलेले आणि मटका धंदाही जोमात सुरू आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मद्यधुंद व्यक्तींमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एकीकडे वरिष्ठ स्तरावरून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र हे प्रकार सुरूच असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!