काळेपडळ येथील तरुण-तरुणीचा मध्यरात्री आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू.


फुरसुंगी / पुणे:

दिवे घाट परिसरातील सेल्फी पॉईंटच्या विरुद्ध बाजूस असलेल्या टेकडीवरून एका २४ वर्षीय तरुणाने आणि २३ वर्षीय तरुणीने दरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आज, २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेएक वाजेच्या (१२:५५ वा.) सुमारास ही घटना घडली. फुरसुंगी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघांनाही दरीतून बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल भिसे (वय २६, रा. काळेपडळ) आणि रिया दराडे (वय २३, रा. काळेपडळ) अशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी दिवे घाटातील टेकडीवरून अचानक दरीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने कसलाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने अंधारातच तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले. दरीत उतरून पोलिसांनी अत्यंत शिताफीने दोघांनाही बाहेर काढले. या दुर्घटनेत रिया दराडे ही गंभीर जखमी झाली असून राहुल भिसे हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

हसत्या-खेळत्या वयातील या तरुण-तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!