‘सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा’; फुरसुंगीच्या प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात सायबर वॉरियर्सकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात सायबर जनजागृती अभियान उत्साहात संपन्न!

फुरसुंगी (पुणे):

प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, गंगानगर (फुरसुंगी) येथे क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा २०२६’ या उपक्रमांतर्गत सायबर जनजागृती सत्र अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सत्र पार पडले. याप्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील सायबर वॉरियर्स प्रणव तळेकर आणि रोहन लिंभोरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शक केले.

प्रात्यक्षिके आणि संवादातून मार्गदर्शन

या जनजागृती सत्रात सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले:

ऑनलाइन सुरक्षा: मजबूत पासवर्ड तयार करणे, सोशल मीडियाचा सुरक्षित व विवेकपूर्ण वापर आणि डिजिटल गोपनीयता जपणे.

फसवणुकीपासून बचाव: संशयास्पद लिंक, बनावट संदेश, ओटीपी (OTP) फसवणूक आणि ऑनलाइन आर्थिक गैरव्यवहारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे.

प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून माहिती दिल्याने विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

“आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवणे आणि त्यांच्यात सुरक्षित ऑनलाइन सवयी विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित डिजिटल भारताच्या निर्मितीसाठी ही जनजागृती मोहीम काळाची गरज आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सायबर गुन्ह्यांबाबत नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!