गुन्हे शाखा युनिट-5ची मोठी कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद!!!!!
पुणे :प्रतीनीध (सोहम मेमन)
पुणे शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट-5 ने मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत एक गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करून सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिस अभिलेखावरील आरोपी चेतन बाळू जाधव (वय 25) हा मगरपट्टा ब्रिज परिसरात गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मगरपट्टा ब्रिजखालील दुचाकी पार्किंग, हडपसर, पुणे येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत त्याच्याकडून 01 गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले. चेतन बाळू जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या कारवाईत सहभागी पोलीस अंमलदार –तानाजी देशमुख, राहुल ठमठेरे, अमित कांबळे, परमेश्वर कदम, अमर चव्हाण, विनोद शिवले, शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शहाजी काळे, प्रशांत कर्णवर, अविनाश इंगळे, नानासाहेब मोरे, नेत्रिका अडसूळ व नासिर देशमुख यांनी सहभाग घेतला.









