पुणे : महिलांसह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालक प्रशांत अनिल गवळी याला पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पैसे दुप्पट करून देण्याचे, तसेच जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली. मात्र ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांना ना परतावा देण्यात आला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली. यामुळे अनेक महिलांची व नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर येथे
गुन्हा रजिस्टर क्रमांक 06/2024 अन्वये खालील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 👇
🔹 भा.दं.वि. कलम 420 – फसवणूक
🔹 भा.दं.वि. कलम 406 – विश्वासघात
🔹 भा.दं.वि. कलम 34 – समान उद्देश
🔹 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID) कलम 3
तपासादरम्यान प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर आरोपी प्रशांत अनिल गवळी याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाई
श्री. अमितेश कुमार गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर
श्री. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
श्री. किशन जाधव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईचे नेतृत्व श्रीमती अर्चना गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, समर्थ क्रॉप केअर कंपनीकडून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.









