Samarth Crop Care प्रकरणी कारवाईची मागणी
पुणे (प्रतिनिधी): राज्यातील शेतकरी व गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत Samarth Crop Care या कंपनीविरोधात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. संबंधित कंपनीचे संचालक व एजंट यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दलित पँथर संघटना यांनी ‘चला सीपी ऑफिस’ आंदोलन जाहीर केले असून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य मागण्या:
मुख्य आरोपी संचालक व एजंट यांना तात्काळ अटक करावी.
आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून मालमत्ता जप्त करावी.
फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना त्वरित न्याय मिळावा.
हे आंदोलन २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुणे पोलीस आयुक्तालय (CP Office) येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
#SamarthCropCare #DalitPanther #Pune
#आंदोलन #आंदोलन









