लोणी काळभोर:कदमवाकवस्तीत कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !!!!!


कदमवाकवस्तीतील तरुणावर तिघांकडून कोयत्याने हल्ला

लोणी काळभोर,  : हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात विवाहसमारंभासाठी आलेल्या एका तरुणावर तिघांनी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश सूर्यकांत पवार (वय २८, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे. सुरेश बाबुराव गायकवाड (वय २८), कुणाल राहुल चांगुडे (वय २८) आणि शुभम धर्मा सोलंकी (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, जखमी अवस्थेत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, कोयत्याचे हल्ले ठिकठिकाणी वाढले आहेत; पण हे कोयते येतात तरी कोठून? कोयते बनविणाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई करावी, म्हणजे कोयते हल्ले कमी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!