पुणे (दि. 07 एप्रिल 2026) – राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा येथील भारत डायग्नोस्टिक सेंटरमध्ये असलेल्या एमआरआय मशीनची कॉपर वायर चोरी केल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी जलद कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
६ एप्रिल 2026 रोजी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 07/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआरआय मशीनमधील सुमारे 30 मीटर लांबीची कॉपर वायर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 50 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला. त्यानुसार सापळा रचून खालील आरोपींना अटक करण्यात आली:
दिनेश भगवान साळवे (वय 22, रा. यशवंतनगर, येरवडा)
बद्रुजमान जिहाऊल शेख (वय 24, रा. ताडीगुट्टा, येरवडा)
अबाहीम नरेश यादव (वय 20, रा. ताडीगुट्टा, येरवडा)
सचिन सुरेश गवळी उर्फ गोल्ड्या (वय 36, रा. ताडीगुट्टा, येरवडा)
आरोपींकडून सुमारे ₹35,000 किंमतीची 30 मीटर कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 04 चिलुमुला रजनीकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच, या कारवाईत लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जगताप, पोलीस हवालदार शिंदे, तसेच पोलीस कर्मचारी कांबळे, ओंबासे, गायकवाड, शेख, परदेशी, जाधव, शिंदे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने पार पडली असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.









