वाहनचोरांना साथीदारांसह बेड्या; गुन्हे शाखा युनिट–६ ची धडाकेबाज कामगिरी
दि. 29/01/2026 रोजी हडपसर, पुणे येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 82/2026 भा.दं.वि. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट–६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अमनोरा पार्क परिसरात सापळा रचून 01 विधीसंघर्षित बालक व खालील आरोपींना ताब्यात घेतले:
पवन तानाजी माने (वय 22 वर्षे)
प्रतीक शिवाजी अस्वरे (वय 20 वर्षे)
अक्षय रमेश भंडारी
तपासादरम्यान आरोपींकडून चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपींकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. 82/2026 – भा.दं.वि. कलम 303(2)
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. 10/2026 – भा.दं.वि. कलम 303(2)
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. 278/2025 – भा.दं.वि. कलम 303(2)
दिघी पो.स्टे. गु.र.नं. 336/2025 – भा.दं.वि. कलम 303(2)
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. 1101/2025 – भा.दं.वि. कलम 303(2)
चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. 493/2025 – भा.दं.वि. कलम 303(2)
हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील इतर 02 मोटारसायकल चोरीचे गुन्हे एकूण सुमारे 7,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त सो. पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटेअमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनीषा लोंढे यांच्या पथकाने पार पाडली









