सेवा, ऐक्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारी संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


संत सेवालाल महाराज जयंती

✨ संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा संपन्न

हडपसर, पुणे – अखिल साडेसतरा नळी परिसरात संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त सेवा साम्राज्य मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात अमोल नाना यशवंत तुपे फार्म हाऊसवर अमनोरा येथे पार पडला. भव्य मिरवणूक, पूजन, भजन, वृक्षारोपण आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

सकाळी काढण्यात आलेल्या भव्य-दिव्य मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला. महिलांची लक्षणीय उपस्थिती हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सायंकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व भजन कार्यक्रम पार पडून परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक मारुती आबा तुपे, मा. नगरसेवक प्रशांत मामा तुपे,मा . नगरसेवक डॉ.दादासाहेब कोद्रे मा. उपसभापती संदीप नाना तुपे, मा. उपसभापती भूषण तुपे, सागर तुपे, एल. व्ही. तुपे, विजय तुपे, राहुल बायस, सुरज मोराळे, विक्रम लोणकर, निशिकांत अहिरे, विलास लोणकर, उत्तम खंडागळे, पितांबर दिवार, कृष्णकांत कोबल, युसुफ मेमन, मनीष कांबळे, क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष अमोल नाना तुपे, अमर तुपे, दिलीप तुपे मेघराज, सुमीत घुले, यशवंत तुपे, ऋषिकेश गायकवाड .सतीश ठोकळे .प्रविण गावडे .अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

कार्यक्रमाचे आयोजन सेवा साम्राज्य मित्र मंडळाच्या नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. संस्थापक श्री संतोष गोवर्धन जाधव .अध्यक्ष श्री. विनायक दिगंबर जाधव, संघटक श्री. मंदार गोवर्धन जाधव, आयोजक श्री. नामदेव गोपीनाथ पवार, उपाध्यक्ष श्री. आकाश संजय पवार, सचिव श्री. अनिल परशुराम राठोड, कार्याध्यक्ष श्री. वैजनाथ मारुती जाधव, खजिनदार श्री. रावसाहेब गोपीनाथ पवार तसेच सह-संघटक श्री. विलास मारुती पवार यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. समाजात ऐक्य, बंधुता, सेवा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा जयंती सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!