
आर.पी.आय.ने दाखवला पुन्हा विश्वास,हडपसर विधानसभा अध्यक्षपदी उच्चशिक्षित लढाऊ नेत्या मीनाज ताई मेमन यांची फेरनिवड!!!!
हडपसर (प्रतिनिधी)-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सौ.मीनाज ताई मेमन यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्तीपत्र आर.पी.आय पुणे शहर अध्यक्ष मा .संजय सोनवणे यांनी देऊन पक्षाचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे आणि एक प्रकारे त्यांनी केलेल्या पक्ष कार्याच्या कामाची पावती दिली असल्याची भावना आर.पी.आय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. यावेळी आर.पी.आय शहरअध्यक्ष संजय सोनवणे,उपमहापौर परशुराम वाडेकर,आर.पी.आय. प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जानराव,प.महाराष्ट्र आर.पी.आय. मोहन जगताप,शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे,नगरसेवक मा.निलेश आल्हाट,नगरसेविका निशा माळवदकर आदी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत मीनाज ताई मेमन यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
हडपसर परिसरातील आर.पी.आय.च्या लढाऊ पाण्याच्या महिला नेत्या मीनाज ताई मेमन यांनी आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब तसेच आर.पी.आय.च्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले आणि पुणे शहराचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मतदार संघामध्ये आरपीआयच्या महिला आघाडीचे जोमाने काम केले असंख्य ठिकाणी महिला शाखांची स्थापना करून शेकडो महिलांना आर.पी.आय.मध्ये सहभागी करून घेतले एक लढाऊ बाण्याच्या नेत्या,महिलांवर अन्याय अत्याचार या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी निळ्या झेंड्याची शिलेदार म्हणून त्यांनी जनमानसांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केली.
पुन्हा एकदा हडपसर विधानसभा आर.पी.आय. महिला आघाडीच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली,या संधीचे भविष्यात सोने करून दाखवणार,आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचे नेतृत्व तळागाळात मजबूत करून, आर.पी.आय.चा लोक कल्याणाचा विचार सर्वत्र पोहोचवणार असा विश्वास मीनाज ताई मेमन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे.
या नियुक्तीबद्दल मिनाजताई मेमन यांचे हडपसर मतदार संघ आणि पुणे शहर या भागातील सर्व आर.पी.आय.च्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलेले आहे.









