माजी नगरसेवक वसंत तात्या मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!!!!


पुणे : माजी नगरसेवक वसंत  तात्या मोरे च्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगर पालिका येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी फिर्यादींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे सामाजिक बदनामी झाली आणि कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण झाल्याचे फिर्यादींनी म्हटले आहे.

दरम्यान, या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार लीकचा निषेध करतात, विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी जबाबदारीची मागणी करतात

14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार लीकचा निषेध करतात, विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी जबाबदारीची मागणी करतात

error: Content is protected !!