हडपसर भाजीपाला मार्केटच्या पुनर्विकासाची मागणी; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांचे महापौरांना निवेदन


हडपसर भाजीपाला मार्केटच्या पुनर्विकासाची मागणी – क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांचे महापौरांना निवेदन!!!!

पुणे : हडपसर येथील प्रसिद्ध भाजीपाला मार्केटची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून व्यापारी व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्केटचा तातडीने पुनर्विकास करून आधुनिक बहुमजली भाजीपाला मार्केट व बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावा, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केली आहे.

याबाबत पुणे महानगरपालिकेच्या महापौरांना निवेदन देण्यात आले. हडपसर भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे ९३१ परवानाधारक व्यावसायिक व्यवसाय करीत असून त्याचबरोबर रस्त्यावर अधिकृत व अनधिकृत विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. याचा त्रास नागरिकांना दररोज सहन करावा लागत आहे.

महापालिका कर नियमितपणे वसूल करत असताना त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची भावना व्यापारी व नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे संबंधित जागेचा तातडीने सर्वे करून तीन ते चार एकर जागेवर आधुनिक बहुमजली भाजीपाला मार्केट उभारण्यात यावे, तसेच बहुमजली वाहनतळाची व्यवस्था करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिक व भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!