पुणे रिक्षा संघटनांचा इशारा: सी.एन.जी. हायड्रो टेस्टिंगचे दर कमी न झाल्यास तीव्र आंदोलन!!!!


पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना लेटरहेडवरून निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीएनजी हायड्रो टेस्टिंगचे वाढते दर तात्काळ नियंत्रणात आणावेत, अन्यथा संपूर्ण पुणे शहरासह महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संघटनांच्या वतीने माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी, Regional Transport Office Pune तसेच District Collector Office Pune यांना निवेदन देण्यात येणार असून परिवहन आयुक्तांनाही ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात येणार आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सीएनजी हायड्रो टेस्टिंगचे दर दिवसेंदिवस वाढत असून पूर्वी सुमारे ५०० रुपयांत होणारे काम सध्या साडेतीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. रिक्षा व्यवसाय आधीच आर्थिक अडचणीत असताना इतके वाढीव शुल्क भरणे चालकांना परवडणारे नाही. संबंधित टेस्टिंग केंद्रे प्रशासनाच्या नियंत्रणात नसतील तर सीएनजी सर्टिफिकेटची तपासणी न करता गाड्यांचे पासिंग करावे किंवा हा विषय संबंधित प्राधिकरणाकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

येत्या आठ दिवसांत सीएनजी हायड्रो टेस्टिंगचे दर एक हजार रुपयांच्या आत न आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

ही मागणी आनंद तांबे (संस्थापक अध्यक्ष – समर्थ सेवा प्रतिष्ठान, अध्यक्ष – पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, वरिष्ठ उपाध्यक्ष – महाराष्ट्र रिक्षा पंचायत, वरिष्ठ उपाध्यक्ष – ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ ऑल इंडिया) यांनी केली आहे


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!