मुंबई:
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नामांकन अर्ज दाखल केल्याबद्दल केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांची काल मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मा. संजय सोनवणे (अध्यक्ष, पुणे शहर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले) यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
नामांकन अर्ज सादर केल्यानंतर आठवले यांनी मुंबई येथील चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करून आशीर्वाद घेतले. सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांचे नेतृत्व पुढील काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी संजय सोनवणे यांनी रामदास आठवले यांना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Views: 149









