फसवणूक प्रकरणाला मोठे वळण गुंतवणूक दाराची मागणी: स्थानिक पोलिसांपासून EOW, ED, SFIO, CBI चौकशीची मागणी . दलित पॅंथर संघटनेचे अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम


पुणे, हडपसर : उद्घाटन सोहळे, शेतकरी मेळावे आणि जास्त  परतावा अशा  विविध संस्थांच्या नावाखाली झालेल्या कथित फसवणूक प्रकरणात आता तपासाचा व्याप वाढवण्याची जोरदार मागणी होत आहे. स्थानिक पोलिसांसोबतच आर्थिक गुन्हे शाखा, केंद्रिय तपास यंत्रणा यांच्याकडून सखोल चौकशी व्हावी, अशी नागरिकांची भूमिका आहे.

या प्रकरणात “GoFarmly”, “Sahwas Media” आणि “Gurukrupa Multipurpose Cooperative Society” यांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. खासदार, आमदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे वापरून विश्वास निर्माण करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य व्यक्ती म्हणून चर्चेत असलेले प्रशांत गवळी यांनीही एका मुलाखतीत “मी एकटाच दोषी नाही, भागीदारांचाही यात मोठा वाटा आहे” असा दावा केला होता. तसेच काही यूट्यूब पत्रकारांकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक पोलिसांकडून गुन्हा नोंदवला व गवळी यांना ताब्यात घेतले तात्काळ गुन्हा  नोंदवला होता. गुंतवणूक दाराची मागणी होत आहे की

Economic Offences Wing (EOW) कडून आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी

Enforcement Directorate (ED) मार्फत मनी लॉन्डरिंगची तपासणी व्हावी

Serious Fraud Investigation Office (SFIO) कडून कंपनी व्यवहारांची चौकशी करावी

Central Bureau of Investigation (CBI) मार्फत संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र तपास व्हावा

या प्रकरणामुळे हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, “केवळ एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण साखळी उघडकीस आणावी” गवळी ने आपल्या एका मुलाखतीत  काही युट्यूब पत्रकार चा सुद्धा उल्लेख केला यांची सुध्दा सखोल चौकशी ची मागणी जोर धरत आहे.

जनतेनेही कोणत्याही आकर्षक ऑफर, मोठ्या कार्यक्रमांच्या आमिषाला बळी पडू नका. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पूर्ण खात्री करा.गोरगरीब जनताअसल्याच जाहिराती  ला बळी पडतात.*


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!