प्रभाग १७ वैदूवाडी स्वप्नपूर्ती सोसायटी शेजारी राहणाऱ्या लोकांना पाणी, रस्ता व ड्रेनेजचा प्रश्न; महिलांचा आक्रोश, क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष अमोल नाना तुपे यांचा इशारा!!!!!
पुणे : प्रभाग १७, वैदवाडी येथील स्वप्नपूर्ती सोसायटी शेजारी राहणाऱ्या परिसरात गेल्या ८ ते ९ वर्षांपासून राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, खराब रस्ते आणि अपूर्ण ड्रेनेज लाईनमुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी परिसरातील पाणी, रस्ते आणि ड्रेनेजचे प्रश्न तातडीने सोडवण्याची आश्वासने दिली होती. मात्र जनतेने निवडून दिल्यानंतर कोणीही या भागाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकरमधील पाणी अस्वच्छ असल्याची तक्रार आहे. काही नागरिकांनी सांगितले की पाण्यात आळ्या आढळून येत असून ते पाणी पिल्याने लहान मुले व महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. “टँकरवाल्याला विचारले असता तो नगरसेवकांनी फोन करावा, मगच पाणी देतो असे सांगतो,” असा आरोप स्थानिकांनी केला. पाण्यासाठी महिलांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.
या परिसरात सर्व धर्मीय नागरिक एकत्र राहत असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वच कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून माहिती मिळाली की गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून येणारे असे एक नाव म्हणजे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या कडे या प्रश्नाकडे लक्ष द्यावे या अपेक्षेने पाहिले
. “जर सर्वसामान्य जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा पाणी पिऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही क्रांती शेतकरी संघटनां अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.









