अमोल यशवंत तुपे फार्म हाऊस अमनोरा येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोरगरीबांना मदतीचा हात; औषध किट्स वाटप व सामूहिक आरती!!!


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा; औषध किट्स वाटप व सामूहिक आरती!!!!

हडपसर (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमनोरा येथील अमोल यशवंत तुपे फार्म हाऊस येथे भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.

शिवजयंतीचे औचित्य साधून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याच्या भावनेतून तसेच निराधारांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने गरजू नागरिकांना औषध किट्सचे वाटप करण्यात आले. समाजसेवेच्या या उपक्रमामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

या प्रसंगी भूषण तुपे, अमर तुपे, बाळासाहेब तुपे, नामदेव भणगे, रुपेश तुपे, विश्वराज शिंदे, महेश तुपे, बबन तुपे, राहुल शिंदे, बाबा तुपे, आप्पा ठाणगे, अमोल बहीरट, नामदेव पवार, प्रभू थोरात, सतीश ठोकळे, उमेश तुपे, राहुल तुपे, संतोष ठाणगे, सनी तुपे, सतीश तुपे, नितीन तुपे, संदीप तुपे, बाळासाहेब कामटे, कुणाल कामटे, विनायक जाधव, आकाश पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विशेष आभार क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष:अमोल नाना तुपे यांनी मानले. शिवजयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!