लॅपटॉप, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डेटा केबल व स्पीकर हस्तगत; दोन आरोपींना अटक
पुणे (प्रतिनिधी):
काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील मेडिकल व मोबाईल शॉपीमधून सुमारे ₹३,७०,०००/- किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना काळेपडळ पोलिसांच्या तपास पथकाने अत्यंत तत्परतेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले २ लॅपटॉप, ३ मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटना व कारवाईचा तपशील:
काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. ३०१/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०५, ३०४(१)) मधील चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
सीसीटीव्ही व गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, दोन इसम चोरीचे लॅपटॉप विक्रीसाठी हांडेवाडी रोडवरील जैन टाऊनशिपजवळ थांबले आहेत. माहिती मिळताच सपोनि अमित शेटे व पथकाने तातडीने सापळा रचून आरोपी १) आदित्य प्रभाकर मांदळे (वय १९) व २) प्रथमेश उमेश भडकवाड (वय १९, दोघे रा. पापडेवस्ती, हडपसर, पुणे) यांना ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल (तक्ता):
काळेपडळ पो.स्टे. गुरं. ३०१/२०२६: ₹१,२०,०००/- (एक लिनीओ कंपनीचा लॅपटॉप)
काळेपडळ पो.स्टे. गुरं. ३८६/२०२६: ₹२,५०,०००/- (एक एच.पी. लॅपटॉप, २ मोबाईल, २ स्मार्ट वॉच, हेडफोन, साऊंडबार, स्पीकर व इतर साहित्य)
एकूण जप्ती: ₹ ३,७०,०००/- (तीन लाख सत्तर हजार रुपये)
पोलीस पथक:
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, सपोनि अमित शेटे, राजस शेख, प्रविण काळभोर, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंढरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेंडीस्कर, महादेव शिंदे व गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने केली आहे. 









