उप अभियंता राकेश शिंदे व कनिष्ठ अभियंता रुपेश वाघ यांनी घेतली दखल; वाहतूक समस्येला दिलासा
हडपसर
:
साडे सतरा नळी ते केशवनगर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था व वाढती वाहतूक कोंडी याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तसेच क्रांती शेतकरी संघटनाचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
रस्त्यावरील खड्डे, धुळीचा त्रास आणि वारंवार होणारी ट्रॅफिक समस्या यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर श्री. राकेश शिंदे (उप अभियंता) तसेच श्री. रुपेश वाघ (कनिष्ठ अभियंता) यांना प्रत्यक्ष भेटून परिस्थितीची माहिती देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तातडीने रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेतले.
सध्या साडे सतरा नळी ते केशवनगर हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामाबद्दल सर्व ग्रामस्थ तसेच क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने उप अभियंता राकेश शिंदे व कनिष्ठ अभियंता रुपेश वाघ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.









