मिळत्या जुळत्या नावामुळे गैरसमज; नोबल हॉस्पिटल्सचे अधिकृत स्पष्टीकरण .डाॅ.दिलीप माने सर


मिळत्या जुळत्या नावामुळे गैरसमज टाळण्यासाठी नोबल हॉस्पिटल्स ची सार्वजनिक सूचना

पुणे, ता. १० जुलै : हडपसर येथील नोबल हॉस्पिटल्सने रुग्ण, नातेवाईक आणि सर्व हितचिंतकां. साठी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. हडपसरमधील नोबल हॉस्पिटल्स, पुणे ही एक स्वतंत्र आरोग्यसेवा संस्था असून, इतर कोणत्याही शहरात मिळत्याजुळत्या नावाने कार्यरत असलेल्या रुग्णालयाशी संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे की, इतर शहरातील समान नावाच्या रुग्णालयांबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्या, सोशल मीडियावरील पोस्ट किंवा इतर कोणत्याही घटना या नोबल हॉस्पिटल्स, हडपसर, पुणे यांच्याशी संबंधित समजू नयेत.

गेल्या १९ वर्षांपासून नोबल हॉस्पिटल्सने नैतिक वैद्यकीय सेवा, रुग्णांची सुरक्षितता, दर्जेदार आरोग्यसेवा आणि करुणामय उपचार यासाठी सातत्याने काम केले असून, रुग्णांचा विश्वास आणि सहकार्य हीच संस्थेची खरी ताकद असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

मिळत्याजुळत्या नावामुळे कोणताही गैरसमज होऊ नये आणि नागरिकांना योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

डायरेक्टर डाॅ :दिलीप माने सर

नोबल हॉस्पिटल हडपसर

 

 


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!