हडपसर :योग ही केवळ शारीरिक व्यायाम करण्याची पद्धत नसून ती आनंदी जीवन जगण्याची एक उत्कृष्ट कला आहे असे योग गुरु राजेंद्रन नायर यांनी सांगितले.
आनंदा जीवन योगा केंद्राच्या वतीने हडपसर येथे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये नायर बोलत होते. ते पुढे म्हणाले,आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. अशा वेळी योग आपल्याला निरोगी राहण्यासाठी प्रभावी मार्ग दाखवतो. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर लवचिक होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत राहते आणि एकाग्रता विकसित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन शैलेंद्र बेल्हेकर,शशिकला कुंभार,ॲड.शिरीष भोसले, भूपेंद्र कांबळे,आयेशा शेख, अतुल रासकर,ईश्वर लोणारे यांनी केले. राज मिथुन,अंबिका राजन यांनी विशेष ध्यानधारणा प्रात्यक्षिक सादर केले.
Views: 3








