काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रेकॉर्डवरील तडीपार आरोपींकडून २ गावठी पिस्तूल, ४ मॅग्झिनसह जिवंत काडतुसे जप्त!


काळेपडळ पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची धडाकेबाज कामगिरी! रेकॉर्डवरील तडीपार आरोपींसह तिघांना बेड्या; २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

पुणे (हडपसर):

काळेपडळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा

निंबाळकर यांच्या पथकाने हद्दीत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. हेवन पार्क परिसरात दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून थांबलेल्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल, ४ मॅग्झिन आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर व महादेव शिंदे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भारती, गणेश चव्हण लोंढे व त्यांचे साथीदार हे हेवन पार्क ते लाईमपार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंधारात हत्यारासह थांबले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि अमित शेटे, पोलीस उप-निरीक्षक विनायक गुरव व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने या मोकळ्या जागेत जाऊन सापळा रचला.

पळून गेलेल्या तडीपार आरोपीला जंगलातून घेतले ताब्यात

पोलिसांनी छापा टाकला असता, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी गणेश लोंढे तिथून पळून गेला. मात्र, पोलिसांनी आकाश संतोष भारती (वय २७ वर्षे) आणि दिपक राम बिस्ट (वय २० वर्षे) यांना जागीच पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, मॅग्झिन आणि २ जिवंत राउंड जप्त करण्यात आले.

यानंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेत असताना, तो दळवीभागेतील दळवी माता फॉरेस्ट परिसरात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून वानवडी पोलीस ठाण्याचा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी गणेश चव्हण लोंढे (वय २५ वर्षे) याला दळवी माता जंगलातून ताब्यात घेतले. त्याच्या झडतीतही आणखी एक गावठी पिस्तूल, मॅग्झिन आणि २ जिवंत राउंड मिळून आले.

तडीपारीचा भंग केल्याप्रकारणी गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) सह १३५, १४२ आणि बी.एन.एस. कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

चार्ज घेताच ॲक्शन मोड!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच गुन्हेगारांविरुद्ध थेट मोहीम उघडल्याने हडपसर आणि काळेपडळ परिसरातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांमधून या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.

या पथकाने केली कामगिरी

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त आणि हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, सपोनि अमित शेटे, पोउनि विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण कळमकर, अमोल घळवरे, राहुल सानप, प्रतीक लाहगुडे, शाहिद शेख आणि पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रविण चेडीवाल, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने केली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!