मतदारांनो सावधान! हडपसर–मांजरीत 2026 मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू – तुमचे नाव यादीत आहे का? लगेच तपासा!!!! !!


हडपसर–मांजरी मतदारांसाठी महत्त्वाची सूचना!

हडपसर–मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांतील मतदारांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ लवकरच सुरू होत आहे.

या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराची माहिती घराघरांत जाऊन पडताळत आहेत. तसेच, मतदार यादीतील चुकीचे तपशील आणि अस्पष्ट फोटो दुरुस्त करण्याचे कामही सुरू आहे.

ज्या मतदारांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही, त्यांनी आपल्या आई-वडिलांची नावे शोधून आवश्यक माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदार यादी नव्याने तयार केली जाणार असून, प्रत्येक मतदाराकडून माहिती फॉर्म भरून घेतला जाईल.

त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवून, संबंधित BLO शी संपर्क साधून या महत्त्वाच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.                                              हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय ,सहाय्यक आयुक्त रवि खंदारे


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!