हिंगणे मळा महिलांच्या सुरक्षेसाठी लोकअदालत; पोलिसांनी दिले ठोस आश्वासन !!!!


हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथील कॅनालच्या भरावावरील निर्जन रस्त्यावर काही समाजकंटकांकडून रोज दारू पिऊन गोंधळ घालणे व येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना अश्लील शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या समस्येच्या पार्श्वभूमीवर, मा. नगरसेवक श्री योगेश बापू ससाणे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ परिस्थितीत सुधारणा झाली होती, मात्र सध्या पुन्हा त्रास वाढल्याने नागरिकांनी पुन्हा एकत्र येत आवाज उठवला.

त्यासाठी शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता हिंगणेमळा येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात लोकअदालत आयोजित करण्यात आली. या लोकअदालतीस काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील उपस्थित होते.

या वेळी परिसरातील २०० पेक्षा अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील साहेबांनी महिलांना सायबर क्राईम, ११२ हेल्पलाईन, बीट मार्शल, आर्थिक गुन्हे तसेच सोशल मीडियावरील गुन्ह्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच “कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार असेल तर निर्धास्तपणे कळवा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे आश्वासन दिले. नागरिकांना स्वतःचा मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवण्याचेही आवाहन त्यांनी केले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.मानसिंग पाटील साहेबांनी आपल्या मनोगतात एवढ्या मोठ्या प्रमाणात, विशेषतः महिलांची उपस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास सौ. अनिता हिंगणे, सुचिता हिंगणे, रुपाली हिंगणे, ऐश्वर्या हिंगणे, सुरेखा हिंगणे, लक्ष्मी हिंगणे, मंदाबाई हिंगणे, जयश्री हिंगणे, शोभा हिंगणे, सुलभा हिंगणे, अर्चना हिंगणे, कुसुम हिंगणे, स्वप्नाली हिंगणे तसेच ज्ञानेश्वर हिंगणे, सतीश हिंगणे, राजेंद्र हिंगणे, संदीप हिंगणे, आण्णा वाडकर, शुभम हिंगणे, विनोद ससाणे आदी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री योगेश हिंगणे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी श्री मानसिंग पाटील व योगेश बापू ससाणे यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!