व्यसनमुक्ती जनजागृती तून समाजप्रबोधन करणाऱ्या मा. शैलेंद्र बेल्हेकर यांना सामाजिक सेवा पुरस्कार…
हडपसर:
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबवत समाजप्रबोधन व समाजसेवा करणारे निःस्वार्थी कार्यकर्ते अशी शैलेंद्र बेल्हेकर यांची ओळख असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी यांनी केले.
शैलाताई रतन माळी स्मारक समितीच्या वतीने शैलेंद्र बेल्हेकर यांना सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्था अध्यक्षा स्मिता वाघ, प्राचार्य रविंद्र वाघ, डॉ. प्रविण देवरे, नगरसेविका उज्वला जंगले, अशोक बालगुडे आणि मनिषा राऊत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
माळी पुढे म्हणाले की, आपण शालेय जीवनात महापुरुषांचा इतिहास अभ्यासतो आणि त्यांच्या महान कार्यातून प्रेरणा घेतो. त्या प्रेरणेवर आधारित सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांची आज समाजाला खरी गरज आहे.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बचपन वर्ल्ड फोरमच्या मुलांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.









