हडपसर १५नंबर, जिजामाता वसाहतीत रमजान ईद उत्साहात, मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण साजरी!!!!


:

हडपसर जिजामाता वसाहतीत रमजान ईद उत्साहात साजरी !!!!!

पुणे : हडपसर येथील प्रभाग क्रमांक १६

, जिजामाता वसाहतीमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) गटाच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा सौ. मिनाजताई मेमन, शाहरुख पठाण आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये मा. मारुतीआबा तुपे, मा. दिलीप आप्पा तुपे, मारणे आबा, सुनील तांबे, दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. यशवंत नडगम, आर.पी.आय.चे संतोष भाऊ खरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच इरफान भाई, अभिजीत साळुंखे, नजीरभाई शेख, कार्तिक मोरे आणि इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!