सिद्धेश्वर हॉटेल समोर गाडीतळ एसटी स्टँडवरील पानपोई बंद; प्रवाशांचे हाल!!!!


हडपसर गाडीतळावर पाण्याचा प्रश्न गंभीर; सिद्धेश्वर हॉटेल समोरील बंद पानपोई सुरू करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

गाडीतळ:

पुणे शहरातील हडपसर गाडीतळ परिसरात, जिथे एसटी स्टँड आहे, तेथे प्रवासी व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. येथील पानपोई सध्या बंद अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हडपसर गाडीतळावर दररोज बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसेस मोठ्या प्रमाणावर थांबत असल्याने प्रवाशांची वर्दळ कायम असते. मात्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे ही गंभीर बाब आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहाचीही कमतरता असल्याने महिला भगिनी व नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज अधिक तीव्र झाली असून, बंद पडलेली पानपोई तात्काळ सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पाणी ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे पुणे महानगरपालिका यांनी तातडीने लक्ष देऊन ही पानपोई सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ही मागणी सामाजिक कार्यकर्त्या मीनाजताई मेमन, साबिर मुलानी, साहिल भाई इनामदार तसेच त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

    सध्या बंद पडलेली पानपोई सिद्धेश्वर हॉटेल समोरील

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!