फुरसुंगी भेकराईनगर हादरली! किरकोळ वादातून रक्तरंजित चाकू हल्ला; दोघे तरुण जखमी, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात !!!!


फुरसुंगी येथे दोघांवर जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, अल्पवयीन ताब्यात !!!!

पुणे (हडपसर) : फुरसुंगी भेकराई नगर परिसरात वादातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सक्षम शंकर जोगदंड (वय २२, रा. भेकराई नगर चौक, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्षम जोगदंड आणि त्याचा मित्र रजनीकांत पुजारी (वय १९, रा. फुरसुंगी) हे दोघे शनिवारी (दि. ११) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भेकराईनगर परिसरात गप्पा मारत उभे होते. त्यावेळी एक अल्पवयीन मुलगा तेथे आला आणि किरकोळ कारणावरून वाद झाला.

वाद वाढत जाऊन दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. संतापाच्या भरात अल्पवयीन मुलाने तीक्ष्ण शस्त्राने सक्षम जोगदंड याच्यावर वार केला. त्यावेळी मध्ये पडलेल्या रजनीकांत पुजारी यालाही दुखापत झाली.

या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!