फुरसुंगी पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेली अल्पवयीन मुलगी २४ तासांत सुखरूप सापडली!


पुणे, फुरसुंगी (दि. १५/०२/२०२६) – फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या २४ तासांच्या आत शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशन गु.र.नं. ५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १३/०२/२०२६ रोजी सकाळी सुमारे १०:०० वा. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ती मिळून न आल्याने दि. १४/०२/२०२६ रोजी फुरसुंगी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार मा. पोलीस उपायुक्त परि-६, पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या सूचनेनुसार तात्काळ पोलिस पथक तयार करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे (फुरसुंगी पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक  खंदारे ,कोमल जाधव पोलीस हवालदार सुनील कांबळे, सतिश काळे,हरी कदम, वैभव भोसले, बिरु घोडके, हनुमंत भिसे, पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सातारा रोड परिसरातून मुलीचा शोध लावला.

मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन फुरसुंगी पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव खंदारे करीत आहेत.

अल्पावधीत मुलीचा शोध लावल्याबद्दल पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!