समर्थ क्रॉप केअर प्रशांत गवळी प्रकरणी पुणे सीपी ऑफिसवर भव्य आंदोलन; दलित पॅंथर संघटनेचा एल्गार!!!
पुणे :
समर्थ क्रॉप केअर व संबंधित बोगस कंपन्यां मार्फत शेतकरी व गुंतवणूकदारांची झालेल्या कथित फसवणुकीच्या निषेधार्थ आज पुणे पोलिस आयुक्तालय (सीपी ऑफिस) येथे भव्य आंदोलन करण्यात आले. दलित पॅंथर संघटना चे अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते, शेतकरी व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हातात झेंडे व फलक घेत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
🔴 प्रमुख मागण्या:
प्रशांत गवळी, त्यांची पत्नी, पाहुणे व संचालक मंडळातील सर्व सदस्यांवर गुन्हे दाखल करावेत.
संबंधितांची मालमत्ता तात्काळ जप्त करावी.
हडपसर परिसरातील कथित चिटफंडची सखोल चौकशी करावी.
प्रशांत गवळी चालवत असलेल्या सर्व बोगस कंपन्यांची आर्थिक तपासणी करावी.
गवळी कृपेनें हडपसरच्या पत्रकाराची कोट्यावधीची प्रॉपर्टी, नडगम यांनी केली चौकशीची मागणी





यूट्यूब चॅनेल वाल्यांचे नाव घेतले जात असल्याने संबंधितांचीही निष्पक्ष चौकशी करावी.
आंदोलनादरम्यान प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.
अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी इशारा दिला की, जर लवकरात लवकर गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
दरम्यान, या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण असून, शासन व पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जर कारवाई झाली नाही जर कारवाई झाली नाही तर विधान भवन ला वेढा घालून जाब विचारला जाईल. असा इशारा दलित पॅंथर चे अध्यक्ष यशवंत भाऊ नडकम यांनी दिला.









