२२ जणांचा बळी घेणारा दत्ता लोंढे वेषांतर करून पळताना जेरबंद; अवैध धंदे चालवणाऱ्या चुलत्याला कधी अटक करणार? नागरिकांचा सवाल.


हडपसर विषारी दारूकांड: सराईत गुन्हेगार दत्ता उर्फ भावड्या लोंढ्याला अटक; मुख्य सूत्रधार चुलता शाम लोंढे अद्याप मोकाट, नागरिकांमधून संताप

(विशेष प्रतिनिधी)

पुणे शहर हद्दीतील भोसरी आणि हडपसर परिसरात विषारी दारूच्या सेवनाने तब्बल २२ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या संपूर्ण दारूकांडातील मुख्य सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. (C.I.D.) पुणे यांच्या संयुक्त पथकाने शिताफीने अटक केली आहे.

वेषांतर करून पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हडपसर पोलीस ठाणे (गुन्हा नोंद क्र. ३७९/२०२६) व दापोडी पोलीस ठाणे (गुन्हा नोंद क्र. ११४/२६ कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता) यांमधील फरार आरोपी दत्ता लोंढे हा शिंदवणे घाट परिसरात वेषांतर करून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक शफकत अमना (सी.आय.डी. पुणे घटक), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व पथकाने धडक कारवाई केली. आरोपी दत्ता लोंढे हा राजेवाडी (ता. पुरंदर) येथे वेषांतर करून आणि गाडीची नंबरप्लेट बदलून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. आरोपीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

माफिया चुलता शाम लोंढे मोकाट; दारू व मटका अड्डे जोमात सुरूच

दत्ता लोंढे याला पोलिसांनी गजाआड केले असले, तरी या संपूर्ण टोळीचा सूत्रधार आणि दत्ताचा चुलता शाम लोंढे हा मात्र अद्याप मोकाट फिरत आहे. ज्याच्या मार्गदर्शनाखाली दत्ता लोंढे विषारी दारूची निर्मिती व विक्री करत होता, तो शाम लोंढे उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि सुपा परिसरात आजही अवैध दारू व जुगाराचे अड्डे खुलेआम चालवत आहे.

दत्ता जेलमध्ये असताना शाम लोंढे याला पोलिसांच्या आशीर्वादाने मोकळे सोडले आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. देशी विषारी दारूचे उत्पादन व मटक्याचे अवैध धंदे करणाऱ्या लोंढे टोळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी मुख्य सूत्रधार शाम लोंढे याला तात्काळ अटक करून त्याचे सर्व अड्डे उध्वस्त करावेत, अशी तीव्र मागणी उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी केली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!