खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस शिताफीने अटकभारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पुणे, दि. २५ जून : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस शिताफीने पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(२), ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मयत इसम तेजस दत्तात्रय पिलंगे (वय २४, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे) याचा दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी शिवपुष्टी गदा चौकापासून कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी आदित्य काका गायकवाड हा फरार होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे व तुकाराम सुतार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी लेकटाऊन रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी आदित्य काका गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले. त्यास दिनांक २४ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजता अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ, पुणे शहर राहुल आवारे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोंडा, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, तुकाराम सुतार, राहुल शेडगे, महेश वारककर, मंगेश पवार, निलेश खेमनाडे, मितेश चोरमले, अभिमन्यू चौधरी, सागर बोरगे आणि सचिन सरपाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून भारती विद्यापीठ पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची व कार्यक्षमतेची प्रचिती दिली आहे.








