“माझी मुलगी द्या, नाहीतर २२ तारखेला जीव देईन!” लोणी काळभोरमध्ये हताश पित्याचा लोणी पोलीस स्टेशन समोरून टाहो……


लोणी काळभोर: १४ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; हताश पित्याचा लोणी पोलीस स्टेशन समोरून आत्मदहनाचा इशारा…..

पुणे: लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेला सात दिवस उलटूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मुलीच्या पित्याने संताप व्यक्त केला आहे.

‘पोलीस तपासात सहकार्य करत नाहीत’…

पीडित पित्याने रात्री २:३० च्या सुमारास लोणी काळभोर पोलीस चौकीबाहेरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेणाऱ्या संशयित आरोपीबद्दल मी स्वतः पुरावे गोळा करून पोलिसांना दिले आहेत. अर्धा तपास मीच केला आहे, तरीही पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाहीये.”

वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याचा आरोप….

एका पित्याने त्यांनी पुढे असेही नमूद केले की, रात्रीच्या वेळी पोलीस चौकीत कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नव्हते. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस आयुक्त (CP) ऑफिसला जाण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, गस्तीवर असलेल्या पोलिसांकडे आरोपीचा किंवा मुलीचा फोटोही पोहोचवण्यात आला नसल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे पोलीस तपासातील त्रुटी अधोरेखित होत आहेत.

२२ तारखेचा अल्टिमेटम…..

“पोलीस यंत्रणेवरचा माझा विश्वास उडाला आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर २२ तारखेपर्यंत त्यांची मुलगी सुरक्षित घरी परतली नाही, तर ते स्वतःचे जीवन संपवतील. या सर्व प्रकाराला पोलीस प्रशासनच जबाबदार असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!