औद्योगिक वसाहत हडपसर मधील हॉटेल ‘एम.बी’चा उर्मटपणा; मुंग्या असलेले सरबत आणि खराब समोसे विकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ!!!!


हडपसर (साबिर मुलाणी):-हडपसर औद्योगिक वसाहत परिसरातील हॉटेल ‘एम.बी’ (Hotel MB) प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळणारा प्रकार समोर आला आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या खाद्य पदार्थां मध्ये मुंग्या आणि खराब झालेले पदार्थ आढळले असून, तक्रार केल्यावर हॉटेल मालकाने चूक सुधारण्याऐवजी उर्मट

पणाची भाषा केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे महानगरपालिकेकडे धाव घेण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सरोदे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल एमबी औद्योगिक वसाहत, हडपसर येथून १० बाटल्या लिंबू सरबत आणि समोसे खरेदी केले होते. यासाठी त्यांनी ६९० रुपयांचे बिलही अदा केले. मात्र, लिंबू सरबत पिण्यास सुरुवात केल्यावर बाटल्यांमध्ये चक्क मुंग्या तरंगताना आढळल्या. तसेच समोसे खाल्ल्यावर ते आंबट आणि विटलेले (खराब झालेले) असल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांशी मालकाचा उर्मटपणा आणि प्रशासनाकडे तक्रार

आरोग्यास अत्यंत हानिकारक असलेले हे पदार्थ घेऊन सुभाष सरोदे यांनी हॉटेल मालकाकडे विचारणा केली. आपली चूक मान्य करून माफी मागण्याऐवजी हॉटेल मालकाने अत्यंत उद्धटपणे उत्तरे दिली. “मालक आपली चूक मान्य करायला तयार नाही, उलट ग्राहकालाच सुनावत आहे,” असा आरोप महाराष्ट्र दलित सेवा चे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाष सरोदे यांनी केला आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर काय करतात यावर प्रश्नचिन्ह?

या घटनेमुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आणि वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी नक्की काय करतात? हॉटेलची नियमित तपासणी का होत नाही?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र दलित सेवा संघटनेने उपस्थित केला आहे.

“सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा हॉटेलवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आम्ही हे प्रकरण अन्न भेसळ प्रशासनाकडे (FDA) नेणार आहोत आणि जोपर्यंत अशा उर्मट हॉटेल चालकावर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”

सुभाष सरोदे (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र दलित सेवा संघटना)

या प्रकरणी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही अशा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!