हडपसर रवि दर्शन सिरम गेट समोर मद्यधुंद टँकर चालकाचा थरार; अपघातानंतर टँकर सोडून ड्रायव्हर फरार!


सिरम कंपनीच्या गेट जवळ रवि दर्शन एसटी स्टॉपजवळ काळाचा घाला दुचाकी स्वार ठार; टँकर सोडून चालक फरार, परिसरात तणाव.

पुणे (महेश टिळेकर):-

हडपसर परिसरातील एका अरुंद रस्त्यावर पुणे महानगर पालिकेचा पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाने मद्याच्या नशेत भरधाव गाडी चालवून एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर मद्यधुंद चालक टँकर सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा पिण्याचे पाणी वाहतूक करणारा टँकर, हडपसरमधील गजबजलेल्या एसटी स्टॉपजवळ हा अपघात घडला. रस्ता अरुंद असतानाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा हा टँकर अत्यंत वेगाने जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  दुचाकीला टँकरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार चाकाखाली आल्याने त्याचा जागीच प्राण गेला.

नियमांची पायमल्ली आणि प्रशासनाचे दुर्लक्ष वाहतूक विभाग करतय काय ?

या अपघाताने टँकर वाहतुकीतील गंभीर निष्काळजीपणा समोर आणला आहे. सदर टँकरवर सुरक्षेसाठी कोणताही (क्लीनर/मदतनीस) उपस्थित नव्हता. अरुंद रस्ता, अतिवेग आणि चालकाचे मद्यपान यांमुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर नागरिक मदतीसाठी धावले असता, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने टँकर तिथेच लावून पळ काढला.

‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ –

या घटनेचा महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सरोदे यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे की:

“मद्यधुंद अवस्थेत टँकर चालवून लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार चालकावर आणि संबंधित टँकर मालकावर तातडीने ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करावा. आरटीओ (RTO) आणि पोलिसांनी या टँकरची सखोल तपासणी करावी. हडपसरमधील अरुंद रस्त्यांवरील ही टँकरची दहशत थांबलीच पाहिजे.”

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर जप्त केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतप्त नागरिकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. बेकायदा वाहतूक करणाऱ्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या मधोमध असतात यांच्यामुळे पण मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा ही मागणी जोर धरत आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!