खडक पोलिसांचा गुन्हेगारांवर प्रहार; ९० हजारांच्या पिस्तुलांसह फरार आरोपी जेरबंद!


 

पुणे:

पुणे शहर पोलीस दलाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीकडून ९० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुलं आणि जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.

खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी सुलतान सय्यद (वय २५, रा. बिबवेवाडी) हा शुक्रवारी पेठ परिसरात येणार असल्याची अचूक माहिती पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने ताब्यात घेतले.

सदर धडाकेबाज कारवाई पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये:

श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर)

श्री. रंजनकुमार शर्मा (पोलीस सह-आयुक्त)

श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग)

श्री. ऋषीकेश रावले (पोलीस उपायुक्त, परिमंडळ १)

श्रीमती अनुजा देशमाने (सहायक पोलीस आयुक्त)

श्री. शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन)

श्रीमती शर्मिला सुतार (पोलीस निरीक्षक, गुन्हे)

श्री. संजय करनूर (पोलीस निरीक्षक)

या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आरोपीला जेरबंद करणाऱ्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उप-निरीक्षक महेंद्र कांबळे, तसेच पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अक्षयकुमार वावळे, कृष्णा गायकवाड, विकास पांडुळे, निलेश दिवटे, शुभम केदारी, दिनेश गायकवाड, विश्वजित गोरे आणि पांडुरंग चंदेल यांचा समावेश होता.

भरवस्तीत बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी खडक पोलिसांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. यामुळे पुणेकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रकारे पोलीस दलाच्या कामगिरीचा आणि सत्याचा पाठपुरावा करत राहील.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!