धक्कादायक प्रकार: ११ मुली बेपत्ता; प्रशासनावर सवाल हडपसरमध्ये खळबळ! संस्थेतून मुली गायबहडपसर हादरलं! रेस्क्यू फाउंडेशनमधून ११ मुली बेपत्ता


धक्कादायक! हडपसरमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून ११ मुली बेपत्ता …

दलित पँथर संघटनेची तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी!!!

हडपसर (कुणाल यादव) :

हडपसर परिसरातील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेतून तब्बल ११ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च २०२६ रोजी उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी दलित पँथर संघटनेने गंभीर चिंता व्यक्त करत तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद सरवदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या मुलींचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून संस्थेच्या सुरक्षाव्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, या घटनेमागे निष्काळजीपणा किंवा अन्य संशयास्पद कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

👉 संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत:

बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी

संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना बळकट कराव्यात

याशिवाय, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!