पुण्यात देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुण अटकेत; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई


पुणे, दि. १७ मार्च २०२६ : लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील शाहदलबाबा दर्गा रोडजवळील मोकळ्या जागेत एक तरुण देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

या कारवाईत पोलिसांनी संशयित तरुणाला पकडले. त्याची ओळख विनयसिंग विनोदसिंग बावरी (वय १९, रा. येरवडा, पुणे) अशी पटली आहे. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त चुलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जेतापुरेकर यांच्या देखरेखीखाली, पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार तसेच पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, कादिर शेख, कांबळे, अतुल जाधव, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी यांच्या पथकाने केली.

सदर आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!