मांजरी:महाशिवरात्रीच्या दिवशी संतापजनक घटना; पुणे महानगर पालिका च्या प्रशासनाचा निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह!!!


धक्कादायक प्रकार उघड; मांजरी बुद्रुक स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष कुत्र्यांकडून विटंबना

पुणे, मांजरी बुद्रुक – मांजरी बुद्रुक गावातील स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त महादेव मंदिर परिसरात उपस्थित असताना स्मशानभूमी परिसरातील भटकी कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काही अवशेष खात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती माजी शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब वसंतराव घुले यांनी दिली.

या घटनेनंतर संबंधित स्मशानभूमीच्या सुरक्षा रक्षकाला संपर्क साधला असता, “आज सुट्टी आहे,” असे उत्तर मिळाल्याचे घुले यांनी सांगितले. त्यामुळे स्मशानभूमीतील सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर घुले यांनी Pune Municipal Corporation प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व स्मशानभूमींमध्ये २४ तास पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, तसेच आवश्यक देखरेख व्यवस्था व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच मांजरी बुद्रुक गाव व झगडे वस्ती परिसरातील अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मृतदेह पूर्णपणे जळेपर्यंत कुटुंबातील काही सदस्यांनी स्मशानभूमीत थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!